Pune Accident News : भरधाव वेगाने बस आली अन् थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली, पुण्याच्या चांदणी चौकातील घटना
पुण्यातील अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून सुमारे 15 फूट खाली कोसळून अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जात होती. यावेळी बस बावधन परिसरात मुख्य रस्त्यावरुन सर्व्हिस रोडवर जात होती.
त्यावेळी बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भीषण होता मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बस मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे बायपासवरून साधारण 15 फूट खालीकोसळली आणि पलटली.
या बसमध्ये 35 प्रवासी होते. यातील 8 प्रवासी जखमी झाले आहेत.
या सगळ्या जखमी प्रवाशांना कोथरुडमधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
पुण्यातील चांदणी चौकात कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पुल पाडूनही पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात शनिवारी रात्री 10 च्या सुमारास हा अपघात झाला.
बस थेट पुलावरुन सर्व्हिस रोडवर जाताना कोसळली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या परिसरात कायम वर्दळ असते.