PM Modi Pune visit: मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.
तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत.
मात्र विरोधकांकडून या दौऱ्याचा विरोध करण्यात येत आहे.
सामाजिक संस्थांचा देखील यात समावेश आहे.
मोठ्याने घोषणाबाजी करण्यात येत आहे.
आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्य़ांनादेखील ताब्यात घेतलं आहे.
अलका टॉकीज चौकात आणि बाजीराव रस्त्य़ावर आंदोलन करण्यात येत आहे.