Rain Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला; पण 'या' दिवसापासून पाऊस पुन्हा वाढणार
Weather Update: राज्यात मागील काही दिवस मुसळधार पाऊस बरसला. मात्र सध्या राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. आज राज्याच्या थोड्याच भागात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update
1/6
राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
2/6
मात्र पुढील 2 ते 3 दिवस कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.
3/6
2 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
4/6
पुण्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे, पुण्यात आज पावसाची शक्यता आहे.
5/6
कोकणातील रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तिथेही आज पाऊस होऊ शकतो.
6/6
संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तिथेही तुरळक पावसाची शक्यता आहे.
Published at : 31 Jul 2023 08:30 AM (IST)