In Pics : शरद पवार यांच्याकडून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचं सांत्वन
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshamn Jagtap) यांचं 3 जानेवारीला कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव परिसरातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकही केलं.
लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना शरद पवारांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, लक्ष्मण जगताप याचं निधन कॅन्सरने झालं. कॅन्सर हा आजार मलादेखील झाला होता. ज्यावेळी मला लक्ष्मण यांना कॅन्सर झाल्याचं कळलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की कॅन्सर या आजारासोबत लढावं लागतं. त्यावेळी मी त्यांना मानसिक धीरही दिला होता. लक्ष्मण जगतापदेखील मला म्हणाले होते की होय मी कॅन्सरशी लढत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सगळे सोबत आणि सहभागी असल्याचं देखील ते म्हणाले.
लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात माझ्यासोबतच झाली. काँग्रेसमध्ये आम्ही असताना पिंपरी चिंचवडमधील 6-7 जण होते त्यात ते एक लक्ष्मण जगताप होते.
नंतर त्यांनी जनसंपर्क वाढवला आणि स्वतःची ओळख निर्माण केली. कालांतराने ते वेगळ्या पक्षात गेले. मात्र त्यांनी संपर्क तोडला नाही.
ते आधी नगरसेवक त्यानंतर महापौर, शहराध्यक्ष, आमदार झाले मात्र त्यांचे पाय कायम जमिनीवर असायचे, असं म्हणत त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचं कौतुक केलं.
कुटुंबातील प्रत्येकाची त्यांनी चौकशी केली.
त्यांच्या घरातील लहानग्यांनाही त्यांनी आशीर्वाद दिला.