Jejuri: जेजुरीत भरलाय गाढवांचा बाजार; कोट्यवधींची उलाढाल
जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. यात चार कोटींपेक्षा जास्त किंमतची उलाढाल झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालेली आहेत.
पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते आणि याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो.
जेजुरीत संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येत असतात.
दहा हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजारापर्यंत भाव या गाढवांना मिळाला आहे.
बाजारात दोन हजारापेक्षा जास्त गाढवे आली होती तर चार कोटी पेक्षा जास्त उलाढाल या बाजारात झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
जेजुरी येथे भरणारा गाढव बाजार मोठा बाजार समाजाला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते.
दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते.
कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गाढवांचा बाजार भरला आहे. त्यामुळे अनेकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे.
यंदाच्या मेळाव्यात दोन हजाराहून अधिक गाढवं आले आहेत. यावेळी या मेळाव्यात कोट्यावधींची उलाढाल झाली आहे