PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; 'मोदीजी माफी मांगो' म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंदोलन
PM Modi pune tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलाय.
डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसरात काँग्रेसने मोदी गो बॅकचे बॅनर लावलेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात आंदोलनं सुरु केली आहेत
काँग्रेसनं पुण्यातील अलका चौकात तर राष्ट्रवादीनं पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलन सुरु केलं आहे.
काँग्रेसकडून गो बॅक मोदीच्या घोषणा दिल्या जात आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेला प्राधान्य देण्याऐवजी मोदी विकासकामांच्या उद्घाटनाला का प्रधान्य देताहेत असा प्रश्न काँग्रेसनं विचारला आहे.
पंतप्रधान मोदींच्या एम आय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य ठरवण्यात आला आहे.
ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल त्यांना तो काढण्यास सांगण्यात येत आहे.
मोदींच्या सभेत काळ्या रंगाचा उपयोग करून कुणी निषेध करु नये यासाठी हे करण्यात येत आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. या फेट्यावर आता काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते, असं काँग्रेस नेते मोहन जोशींनी म्हटलं होतं. जोशी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून कॉंग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं. विरोधानंतर फेट्यावरील राजमुद्रा हटवण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, जागोजागी निदर्शनं