Pune Marathon Photo : देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन
Pune Marathon : देशामध्ये पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला काल रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली.
देशात प्रथमच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा या वेळी रात्री घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव.
मात्र ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह मात्र आजिबात कमी नव्हता.
या पुण्याच्या मॅरेथॉनला देश-विदेशातून मॅरेथॉनपटू येत असतात. यावर्षी देखील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये परदेशातील 30 धावपटू व देशातील 2500 धावपटू सहभागी झाले.
पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.
ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह मात्र आजिबात कमी नव्हता.