Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींचं आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर थेट देहूत जात तुकाराम महाराजांचं दर्शन, पाहा फोटो...
पुण्यात बागेश्वर धामच्या धीरेद्र शास्त्रींनी देहूत संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी त्यांनी संत तुकामार महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी रोष व्यक्त केला होता.
त्या प्रकरणानंतर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात माफीदेखील मागितली आहे.
'संत तुकाराम महाराजांबद्दल मी केलेलं वक्तव्य चुकून झालं होतं. भारतात संतांची परंपरा आहे. तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो. त्यावेळी वारकऱ्यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं ते म्हणाले.
या तुकाराम महाराज मंदिरांच्या विश्वस्त आणि बाकी लोकांनी वारकरी सांप्रदायाचं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घडवलं या परंपरेची ओळख करुन दिली. याच संतांचा आशीर्वाद जर भारताला मिळत राहिला आणि शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्य स्थापनेचा संकल्प संपूर्ण भारतात पूर्ण केला जाईल आणि भारत हिंदू राष्ट्र बनेल', असं धीरेद्र शास्त्री म्हणाले.
यावेळी देहू संस्थानाचे विश्वस्त उपस्थित होते.
सोबतच जगदीश मुळीक आणि भाजपचे इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.
यावेळी पगडी आणि गाथा देत त्यांचं स्वागत केलं.