National Nutrition Week 2022: ज्वारीचे न्यूडल्स तर बाजरीचे आप्पे...! राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त आजीबाईंच्या पारंपरिक 'पौष्टिक खाऊची' स्पर्धा
1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. मुलांनी पौष्टीक खावं, यासाठी डी ई एस पूर्व प्राथमिक शाळा हा सप्ताह साजरा करणार आहे. (फोटो- अमोल गव्हाळे))
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलांचं खाणं खूप कमी झालं आहे, असं आम्हाला जाणवलं. पौष्टीक खाण त्यांना माहिती नाही, असं दिसून आलं. त्यामुळे या शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहव तसेच आपला आहार पोषक असावा हाच या सप्ताहचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात 150 हून अधिक आजींचा सहभाग आणि उपस्थिती पाहायला मिळाली.
. या वेळी या सगळ्या आजींकडून नाचणीचे लाडू, गवरीच्या पुऱ्या, ज्यावरीच्या नूडल्स, डींकाच्या वड्या या सारखे अनेक घरगुती आणि शरीराला पौष्टिक असलेले खाद्य पदार्थ बनवण्यात आले.
हे पौष्टिक पदार्थात कोणते प्रथिने आहे. हे सुद्धा पदार्थांच्या बाजूला लिहिलं होतं.
मुलांच्या आरोग्यासाठी सगळ्या महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
फास्ट फूडच्या काळात पौष्टिक आणि शरीरासाठी योग्य तो आहार कसा जपावा हा संदेश या प्रदर्शनात देण्यात आला.