Pune Ganeshotsav 2022: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दगडूशेठच्या दरबारात
केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी यांनी उत्सवमंडपात उपस्थित महाराष्ट्रातील वारक-यांसोबत टाळ हातात घेऊन 'रामकृष्ण हरी'चा गजर देखील केला.
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात येऊन दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांना महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक पुणेकरांचा दगडूशेठ हा लाडका बाप्पा आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोठ्या दिमाखात पंचकेदार मंदिरात विराजमान झाले आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत.
प्रत्येक नेते, अभिनेते यांचं देखील दगडूशेठ गणपतीबरोबर वेगळं भावनिक नातं आहे