In Pics : पुण्यातील कोंढवा परिसरात NIA ची मोठी कारवाई
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर NIA, ATS आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया छाप्यात 'PFI'च्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.
त्याचबरोबर नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
कोंढवा परिसरात सकाळच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली होती.
पीएफआयचं महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी दोघांची नावे आहेत.
मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे समाजात तेढ वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.