Pune Shivsena News: रामदास कदम यांच्या फोटोला जोडे दाखवत आंदोलन; पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल  केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

pune

1/9
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
2/9
त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेनेने रामदास कदमांच्या फोटोला जोडे दाखवून जोरदार आंदोलन केले.
3/9
पुण्यातील स्वारगेट परिसरात शिवसैनिकांनी आक्रमक होत हे आंदोलन केलं आहे. 
4/9
त्यांचा फोटो देखील दहन करण्यात आला. गाढवाच्या शरीराला रामदास कदमांचा फोटो लावत शिवसैनिकांनी विरोध दर्शवला.
5/9
या आंदोलनात रामदास कदमांच्या विरोधात विविध घोषणाबाजी करण्यात आल्या.
6/9
शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली.
7/9
शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सहभगी झाले होते.
8/9
ठाकरे कुटुंबियांविषयी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
9/9
त्यावर आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
Sponsored Links by Taboola