Pune : 'राष्ट्रीय विज्ञान दिन' पुण्यात उत्साहात साजरा! शाळकरी विद्यार्थांच्या विज्ञान प्रयोग प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद!
बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. (Photo Credit : Reporter/Pune)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइ-वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पीपीटी.प्रेझेंटेशन सादरीकरण, विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण, स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. (Photo Credit : Reporter/Pune)
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला, त्यांपैकी उत्कृष्ट प्रयोगांचे प्रदर्शन नवीन मराठी शाळेत भरविण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते बाल वैज्ञानिकांना बक्षिसे देण्यात आली. (Photo Credit : Reporter/Pune)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. (Photo Credit : Reporter/Pune)
या कार्यक्रमाला मानसशास्त्रज्ञ समुपदेशक, Nurture your child या समुपदेशन केंद्राच्या संचालिका चैताली कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. (Photo Credit : Reporter/Pune)
प्रमुख अतिथी चैताली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टीसाठी गुगलचा वापर न करता आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करा अशा आशयाची गोष्ट सांगितली व सर्व बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगांचे खूप खूप कौतुक केले. (Photo Credit : Reporter/Pune)
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना, आपली जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवा, विज्ञानाची कास धरा, देशाची प्रगती करा. असा संदेश दिला. (Photo Credit : Reporter/Pune)
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. पवनचक्की, सूर्यचूल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, ठिबक सिंचन ,जलचक्र, सूर्यमाला,बिजांकुरणतरंगणे-बुडणे, पाण्याची घनता, हवेचा दाब, प्रकाशाचे अपवर्तन, आंतरेंद्रिये ,फुफ्फुसाचे कार्य अशी विविध मॉडेल्स प्रयोग सादर केले. (Photo Credit : Reporter/Pune)
मांडलेल्या विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक सादरीकरण प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी चैताली कुलकर्णी व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Photo Credit : Reporter/Pune)
शाळेत भरविण्यात आलेली विज्ञान प्रयोग प्रदर्शन पुढील २ दिवस पालकांसाठी देखील खुली असणार आहे अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली. (Photo Credit : Reporter/Pune)