Pune News : ना डीजे, ना रॅली; डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त MPSC विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास करणार
महापुरुषांची जयंती आपण अनेक पद्धतीने साजरी केल्याचं पाहिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी डिजे लावून धिंगाणा केला तर कधी मोठ मोठे कार्यक्रम आणि रॅली आयोजित करुन शक्ती प्रदर्शन केल्याचं आपण पाहिलं आहे.
मात्र पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबासाहेब आंबोडकरांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट 18 तास सलग अभ्यास करण्याता निश्चय केला आहे.
आज सकाळी सहा वाजेपासून हे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बसले आहेत.
त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबासाहेबांसाठी काही करायचं असेल तर तो फक्त अभ्यास आहे. त्यामुळे आम्ही आभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.