Pune : पुणे जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ
पुणे जिल्ह्यात रेशीम कोषाच्या उत्पादनात (Silk Production) चांगली वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे जिल्ह्यात 2022-23 या वर्षात आत्तापर्यंत दोन लाख किलोपेक्षा अधिक रेशीम कोषाचं वार्षिक उत्पादन झाल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी दिली आहे.
यावर्षी तुती लागवडीसाठी 250 एकर लक्षांकापैकी 241 एकर क्षेत्रावर 226 शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे.
चालू वर्षात 3 लाख 9 हजार 400 अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून 2 लाख 18 हजार 414 किलोग्राम कोषांचे उत्पादन झालं आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेशीम संचालनालय यांच्याकडून कोषांची खरेदी
पुणे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी 13 लाख 33 हजार 913 रुपये मंजूर झाले आहेत.
लाभार्थ्यांना रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 175 अल्पभूधाक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे
महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेशीम संचालनालय यांचे समन्वयाने ईनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.
रेशीम शेती उद्योगामध्ये कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत आर्थिक लाभ मिळतोच, परंतू याशिवाय तुती पाल्यापासून 'ग्रीन टी' तयार केला जातो. हा मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात गुणकारी ठरत आहे.
प्युपापासून (सुरवंटापासून) मत्स्यखाद्य आणि तेल निर्मिती होते. तसेच तुतीच्या फळांपासून उच्च दर्जाची वाईन निर्मिती केली जाते. याशिवाय अलीकडच्या काळात रेशीममध्ये असणारे सेरीसिन या रसायनांपासून विविध औषधे निर्मिती केली जाते.