Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांच्याकडून चिवरदान अन् धम्मदान अर्पण
महामानव, विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी बौद्ध भंते डॉ. राहुल बोधी, भंते धम्मसेन बोधी, भंते विमल बोधी, भंते अनोमादस्सी बोधी यांनी त्रिसरण पंचशील दिलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो, या करता मंगल मैत्री दिली.
पाटील यांच्या शुभ हस्ते चिवरदान आणि धम्मदान करून एक अगळ्या, वेगळ्या पद्धतीने जयंतीच्या पूर्व संध्येला जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरात आणि वस्ती पातळीवर धम्माचे कार्यक्रम व निराधार मुलांना शैक्षणिक उपक्रम आयोजित करावे यासाठीची सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या नियोजनाखाली घेण्यात आला आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष आसिफ गांगुर्डे, निलेश अल्हाट भाजपचे प्रदेश सचिव अतुल नाना साळवे,विकास सोनवणे,संदीप शेळके संदीप ओव्हाळ,वीरसेन जगताप, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.
बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे, असं म्हणत त्यांनी अभिवादन केलं.
त्या सगळ्यांबरोबर चर्चादेखील केली.