Pune News : शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीचा विराट मोर्चा
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
शिक्षणाचे कंत्राटीकरण, कमी पट संख्येच्या शाळा बंद करणे या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.
हजारोंच्या संख्येने शिक्षक, मुख्याध्यापक तसेच पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जवळपास 30 ते 32 संघटनांचे पदाधिकारी यावेळी हातात निषेधाचे फलक, बॅनर घेवूनसहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाद्वारे काढण्यात आलेल्या शाळा दत्तक योजना, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण आणि समूह शाळा योजनेच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरणाला विरोध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या वतीने आम्ही मोर्चा काढला होता.
सरकारने त्वरित शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आलं.
या मोर्चामध्ये आमदार रोहित पवार, रवींद्र धंगेकर, भालचंद्र मुणगेकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर मोर्चात सहभागी झाले होते.