Pune news : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक; चंद्रशेखर बावनकुळे अन् चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2023 04:23 PM (IST)

1
मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाकडून गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

3
सकाळी जुन्नरला जाताना आणि जुन्नरवरून पिंपरी चिंचवडकडे येताना उपोषणस्थळी येऊन मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या नाहीत.
4
त्यामुळं संतापलेल्या मराठा क्रांती मोर्चाने बावनकुळे आणि पाटलांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
5
ताफ्यातील पोलिसांनी तातडीनं या सर्वांना बाजूला करून, ताफ्याला वाट करून दिली.
6
ताफ्यात बावनकुळे आणि मंत्री पाटील दोघे ही होते, असा दावा आंदोलन कर्त्यांनी केला
7
यावेळी मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली
8
काही वेळ गोंधळाचं वातावरणदेखील निर्माण झालं होतं.