In Pics : हजारो भाविक अन् रोषणाई! वीरमध्ये पार पडला श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा
पुरंदर तालुक्यातील वीर येथे असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे आणि सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक गावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
पुढील दहा दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू असणार आहे.
या यात्रेनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
रात्री मानकरी, पुजारी, सेवेकरी आणि भाविकभक्त यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्या निमित्त मागील दोन दिवस पासूनच अनेक भाविक वीरमध्ये दाखल झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील कोडित, राजेवाडी त्याचा बरोबर बारामती तालुक्यातील सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतील मानाच्या पालख्या वीर येथे आल्या आहेत.
रात्री देवाचीकाठी आणि पालखी यांची मदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
नाथा साहेबाचा चांगभलं असा जयघोष करीत अनेक भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग ढोल लेझीमच्या तालावर नृत्य केले.
गावात उत्साहाचं वातावरण आहे.