In Pics : सदानंदाचा येळकोट, येळकोट..अठरापगड जातींचा देव मल्हार; जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरु झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्षे हा उत्सव झाला नव्हता.
मात्र यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
40 किलोची देवाची तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते.
या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते.
या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये समोरआली होती ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यानंतर पहाटे खेळाला सुरुवात होते.
भाविक फेटे बांधून यात सहभाग घेतात.
गडावर या दरम्यान उत्साहाचं वातावरण असतं.