PHOTO : जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची नयनरम्य दृश्ये
जेजुरीच्या खंडोबा मंदिर गडकोटामध्ये मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेजुरी गड, जयाद्री डोंगरखोऱ्यातील पालखी सोहळा, मध्यरात्री होणारी देवभेट, भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, तलवारीची स्पर्धैा यामुळे जेजुरीचा दसरा मेळावा महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध आहे.
श्री मार्तंड देवस्थानकडून या मर्दानी दसऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.
श्री खंडोबा देवाचे उत्सवमूर्ती बालद्वारीमधून मुख्य गाभाऱ्यामध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर खंडोबा गडावर ध्वज पूजन वाद्यपूजन आणि खंडा पूजन विधीवत करण्यात आले.
संध्याकाळी सहा वाजता भेटीसाठी गडावरुन पालखीचं प्रस्थान झालं.
कडेपठार आणि खंडोबाच्या मंदिरातून निघालेल्या पालखीची भेट रात्री दोन वाजता रमणा दरीखोऱ्यात झाली.
यावेळी फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. देवभेटीनंतर आपटापूजन करुन सोनं लुटण्यात आलं.
यानंतर ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत पालखी आज पहाटे मंदिर गडकोटामध्ये पोहोचली.