In Pics : लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पहा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्याचे खास फोटो
65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) फड आजपासून पुण्यात (Pune News) रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभव्य दिव्य सोहळ्याचं उद्घाटन पार पडलं.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत.
आजपासून मानाच्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.
कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते पार पडलं.
अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेची तयारी मागील काही दिवसांपासून जोमात सुरु होती. अखेर आज या ठिकाणी पहिली कुस्ती रंगणार आहे.
यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डिअॅक अॅम्ब्युलन्ससह चार अॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री आणि जहांगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे.