lalit Patil drug case : ललित पाटीलचा पाहुणचार करणाऱ्या डॉक्टरचं नाव समोर; ससूनमधीलं कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर एबीपी माझा'च्या हाती
ड्रग माफिया ललित पाटील नेमक्या कोणत्याच डॉक्टरच्या शिफारशीवरुन ससून रुग्णालयात पाहूणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी या संदर्भात माहिती देताना उडवाउडवीचे उत्तरं दिले मात्र ते स्वत:च या ललित पाटीलवर उपचार करत असल्याचं आरोपींचे रजिस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
त्यामुळे मागील काही महिने ललित पाटीलचा पाहूणचार थेट संजीव ठाकूर करत असल्याचं सिद्ध झालं आहे.
ड्रग माफिया ललित पाटीलवर उपचार ससुन रुग्णालयातील नक्की कोणत्या डॉक्टरांनी केले, याची माहिती देण्यास आजपर्यंत ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आजतागायत नकार दिला.
पत्रकार असतील, विभागीय आयुक्त असतील किंवा राजकीय नेते असतील डॉक्टर संजीव ठाकूर यांनी गोपनीयतेच्य नावाखाली ही माहिती आजतागायत कोणालाच दिलेली नाही.
कैद्यांच्या नोंदी असलेल्या या रजिस्टर मध्ये त्या रुग्णाचे नाव, त्याच्यावर कोणत्या आजारांवर उपचार सुरु आहेत, त्या आजाराचे नाव आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाची सुरुवातीचे अक्षरं लिहिण्यात आले आहेत.
या रजिस्टरमधील नोंदीनुसार ललित अनिल पाटील याच्यावर हर्नियाच्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे एस. एस. टी. हे डॉ. एस. एस. टी. हे दुसरे तिसरे कोणी नसून ससूनचे डीन डॉक्टर संजीव शामराव ठाकूर हे स्वतःच आहेत.
त्यामुळे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याच शिफारशीवरून ललित पाटील ससूनमधे तळ ठोकून होता हे सिद्ध होत आहे.