'देवा तुझी सोन्याची जेजुरी', लक्ष लक्ष दिव्यांनी सोन्यासारखा उजळला खंडोबा गड
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी खंडोबाच्या गडावर हजारो दिवे लावण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखंडोबा मंदिरासमोरच्या कासवाजवळ दिवे लावण्यात आले होते.
पुजारी, कर्मचारी, सेवेकरी यांच्या वतीने हे दिवे लावण्यात आले होती
देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्तीप्रमाणे खंडोबा गड सोन्यासारखा उजळून निघाला.
“सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करीत भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.
त्रिपुरारी पौर्णिमा ही शिवमंदिरांसमोरील दीप पाजळून साजरी केली जाते. हा भगवान शंकराचा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगास्नान करावे असा विधी आहे.
देवस्थानात ज्या दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात.
या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.