Dagdusheth Ganapati Temple : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दीपोत्सव, लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळलं मंदिर
दिवाळीची त्रिपुरारी पोर्णिमा म्हणजे दिव्यांचा सण, हा सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने देशभरातील मंदिरं ही दिव्यांनी उजळली जातात.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये तब्बल एक लाख दिव्यांनी मंदिर सजवण्यात आलं.
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.