Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! जेजुरीच्या खंडोबाच्या दरबारी आंब्यांची मनमोहक आरास
जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात हापुस आंब्यांची आणि पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंब्याच्या सजवटीमुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे.
खंडोबाचा गाभारा आमराईप्रमाणे मनोहरी दिसत आहे
ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये आंब्याची आरास केली जाते.
उन्हाळ्यामध्ये अनेक भाविक देवाला आंबे अर्पण करतात. त्यातून गाभाऱ्यात सजावट केली जाते.
सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे.
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अनेक चाकरमानी भाविक जेजुरीत दर्शनासाठी गर्दी करीत असतात.
त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळीच ही आरास करण्यात आली आहे.
मार्तंड भैरवाच्या मूर्तीला, स्वयंभू लिंगाला सजावट करण्यात आली आहे.
आंब्याचे डहाळे आणि त्यात आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला आहे.
मंदिरातील सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.