Pune NCP 2000 Note : घोषणाबाजी करत राष्ट्रवादीकडून दोन हजारांच्या नोटेला श्रद्धांजली
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.
पुण्यातील राष्ट्रवादीच्यानेत्यांनी एकत्र येत दोन हजार रुपयांच्या नोटेचा श्रद्धांजली वाहिली.
आरबीआयसमोर सगळ्यांनी मोठ्याने घोषणाबाजी केली.
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदीकरून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली व आज जवळजवळ सहा वर्षांनंतर ती नोटही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही नोट देशाच्या अर्थव्यवस्थेकरीता किती पोषक आहे हे भाजपचे समर्थक गेली अनेक वर्षे घसा फोडून सांगत आहेत मात्र आज त्या सर्वांना मोदींनी तोंडावर पाडले आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
भक्तांच्या या दुःखात सहभागी होण्याकरीता या 2000 रुपयांच्या नोटेला श्रध्दांजली देतोय, असंही ते म्हणाले.