Indapur : 'कॅनॉलचे पाणी आमच्या शेतात आल्यावर आम्ही कुणावर केस करायची?' शेतकऱ्यांचा सवाल!
इंदापूर तालुक्यातील सनसर येथे कॅनॉल फुटल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनीरा डावा कलावा फूटल्याची 15दिवसातील पंधरा दिवसात दुसरी घटना आहे. शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
विहिरीत पाणी जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
एकीकडे इंदापूर तालुक्यातील काही गावे डाव्या कालव्याच्या पाण्याची वाट बघत आहेत. त्यांना पाणी नाही म्हणून डोळ्यात पाणी येत आहे
'जर शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी घेतले तर शेतकऱ्यांवर केस केली जाते, परंतु कॅनॉलचे पाणी आमच्या शेतात आल्यावर आम्ही केस कुणावर करायची?' असा सवाल शेतकऱ्याने सरकारला विचारला आहे.
रायते मळा येथे कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. या शेतकऱ्याने शेतात कालच माती भरली होती त्याची माती पुन्हा वाहून गेली आहे.
15 दिवसांपूर्वी त्यांच्या शेअत कॅनॉल चे पाणी शिरल्याने मती वाहून गेली होती. त्यानंतर त्यांना कोणतीही सरकारी मदत झाली नाही.
पाण्याने विहिरीत देखील गाळ भरला आहे. कर्ज काढून शेतकऱ्याने काल रानात माती भरली आणि आज पाणी येऊन माती वाहून गेली आहे.
एकाच ठिकाणी 2 वेळा कॅनॉल फुटतो त्या अधिकाऱ्यांना कॅनॉल फेकून दिले पाहिजे अशी आक्रमक प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली आहे
या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.