Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम 90 टक्के पूर्ण; पाहा फोटो...
पुण्यातील बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील (Chandani Chowk) प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. या पुलाची पाहणी करुन 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार असल्याची घोषणा मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली होती. त्यानंतर चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामाला वेग आला होता.
पुणेकर मागील अनेक महिन्यांपासून हा उड्डाणपूलाच्या लोकार्पणाची वाट बघत होते.
अखेर 1 मे रोजी या उड्डाणपूलाचं उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर काम वेगाने करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाला वेग आला होता
काही दिवसांपूर्वी त्यांनी या संपूर्ण कामाची पाहणीदेखील केली होती.
या उड्डाणपुलाचं गर्डर टाकण्याचं काम 15 ते 20 एप्रिल दरम्यान करण्याचं नियोजन केलं आहे.
हे काम सुरु होण्यापूर्वी या मर्गावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे.
त्यासोबतच मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गाचं कामदेखील सुसाट सुरु आहे.