Pune News : इंदापूर मध्ये उजनीत मिळाला तब्बल 30 किलो वजनाचा मासा; माशाची गावभर चर्चा
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
06 Mar 2023 08:23 PM (IST)
1
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील मच्छिमार कृष्णा रजपूत याला भीमा नदी पात्रात मासेमारी करताना तब्बल 30 किलो वजनाचा सिल्वर जातीचा मासा सापडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मासळी बाजारात या माशाची 180 रुपये किलो दराने विक्री झाली.
3
या माशाच्या विक्रीतून त्याला साडेपाच हजार रुपयाचं उत्पन्न मिळालं.
4
याआधी कधीही एवढा मोठा मासा सापडला नव्हता असं कृष्णाने सांगितले.
5
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारातील दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजश्री फिश मार्केट या आडत दुकानात तो तब्बल 5 हजार 400 रुपयांना विकत घेतला.
6
सिल्व्हर जातीतील एवढा मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
7
धूळवड सणाच्या निमित्ताने या माशाची जोरदार चर्चा होत आहे.
8
अनेकांनी या माशासोबत फोटोसेशनही केलं आहे.