Pune news :शाळेतील कचरा पेटवून वाल्हेतील विद्यार्थ्यांची अनोखी होळी
सर्वत्र होळीचा सण आनंदाने साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वत्र होळी ही शेणाच्या गोवऱ्याची पेटवली जाते परंतु पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये याला अपवाद आहे.
विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता करुन विद्यार्थ्यांनी आज कचऱ्याची होळी पेटविण्यात आली.
होळीसाठी गावातील ग्रामस्थ, तरूण वृक्षतोड करुन पर्यावरणाची हानी करुन सण साजरे करतात.
वाल्हे येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडांची कत्तल न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि पर्यावरणसाखळी नियमित सुरू राहील असा या होळी मागचा उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत होळी सभोवती फेर धरला.
राग, क्रोध, मत्सर, भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेद निरक्षरता आदि दुर्गुणरूपी फलक हातात घेऊन होळी सभोवती फेरी मारली.
पर्यावरणाचं रक्षण करा, असा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.