मावळच्या शेतकऱ्याचा जुगाड, टाकाऊपासून तयार केली विंटेज कार, एकदा चार्ज केली की....
पण आम्ही तुम्हाला एक असा शेतकरी दाखवणार आहोत, की तुमच्या भुवया उंचावतील. कारण या शेतकऱ्याने अशी एक कार बनवलीय. ज्याचा संबंध थेट ऐतिहासिक गोष्टींशी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील बळीराजाने विंटेज कारची निर्मिती केली आहे. साहजिकच तुम्ही म्हणाल चेष्टा करता की काय? पण पुण्याच्या मावळ मधील दहावी शिकलेल्या बळीराजाने इंजिनिअरला लाजवेल अशी किमया साधली आहे.
भारतीय बनावटीची ही विंटेज कार ई व्हेईकल आहे. एकदा चार्ज केली की ही विंटेज कार तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते. त्याने टाकाऊ पासून टिकाऊचा हा अफलातून जुगाड केला.
पुण्याच्या शेतकऱ्याने तयार केलेली ही विंटेज कार पाहून तुम्हाला नवल वाटलं असेल. कारण, ही विंटेज कार साकारणारे हात एका शेतकऱ्याचे आहेत.
विशेष म्हणजे ही विंटेज कार ई-व्हेईकल आहे. त्या शेतकऱ्याचे नाव रोहिदास नवघणे असे आहे.
त्याला स्थानिक लोक इंजिनिअर शेतकरी म्हणून ओळखतात. रोहिदास नवघणे यांचं शिक्षण -अवघे दहावीपर्यंत झालेय.
त्यांचा मूळ व्यावसाय शेती हाच आहे. या शेतकऱ्यांने एखाद्या इंजिनिअरला लाजवेल अशी किमया साधली आहे. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं.
पण ते स्वप्न केवळ पाहून चालत नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती पणाला लावावी लागते. तेंव्हाच तुमच्या स्वप्नांना अशी गगन भरारी मिळते.