Pune Rain: कुठे पाणी शिरलं तर कुठे झाडं पडली; चार तासाच्या पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण
पुण्यात 4 तास मुसळधार पाऊस झाला. अचानक मुसळधार आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविसर्जन मिरवणुक पार पडल्यानंतर मात्र 4 तासांच्या पावसाने पुणं धून काढलं. या पावसामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालं आहे.
दहाहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले.
एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा, ज्योती हॉटेल जवळ कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या परिसरात झाड पडले आहेत मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही आहे.
आंबील ओढा, वानवडी या परिसरतील काही घरांमध्ये अति प्रमाणात पाणी शिरल्याने नागरीकांना रात्री मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं.
पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या
पाषाण, पंचवटी, स्टेट बैंक नगर येथे पहाटे चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते.
या मुसळधार पावसाने पुणेकरांचं मोठं नुकसान झालं.