PHOTO : पुण्यात पावसाचा धुमाकूळ, कोथरूडमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी
पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. मुसळधार पावसामुळे कोथरूडमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साठल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागतंय.
आंबेगावतील गायमुख ओढापूल परिसरात रस्ता पाण्याखाली गेलाय. चांदणी चौकाकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्यालांब रांगा लागल्या आहेत. हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. तर चंदननगर पोलीस ठाण्यात पावसाचं पाणी शिरलंय.
मुसळधार पावसानंतर पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. एका घराची भिंत पडलीय. लोक घरातील पाणी बाहेर काढत आहेत.
आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटी झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाण आले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेली वाहने वाहून गेली आहेत. यात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी. टी. ईवडे रोड,कात्रज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलंय.
शहरात सहा ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पाषाण येथे एनसीएल जवळ, साळुंखे विहार, कोंढव्यात ज्योती हॉटेल जवळ, चव्हाणनगर येथे रुबी हॉल जवळ आणि पुणे स्टेशन परिसरात झाडे पडली आहेत. मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही.
चंदननगर पोलीस ठाण्यात पावसाचं पाणी शिरलंय. पोलीस ठाण्यात जवळपास गुडघाभर पाणी साचलंय.
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना प्रचंड कसरत करत वाहने बाहेर काढावी लागत आहेत.