In Pics : पुणे तिथे काय उणे! पुण्यात भारतातील सगळ्यात खोल भुयारी मेट्रो स्टेशन; पाहा फोटो...
शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची खोली जमिनीच्या 108फूट खाली (33.1 मीटर) एवढी असून, शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजीनगर बहुउद्देशीय वाहतूक केंद्राची विविध कामांनीही वेग घेतला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १७ किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी या १६ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत.
या दोन्ही मार्गिका शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकात एकमेकांना एकत्र येणार आहेत.
मा मार्गावरुन काही दिवसांपूर्वी मेट्रो ट्रायल रन पार पडली होती.
भूमिगत स्थानकाचे छत 95फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे एकमेव स्थानक आहे.
स्थानकाचा एकूण परिसर 11 एकर असून स्थानकामध्ये येण्या-जाण्यासाठी एकूण सात दरवाजे असतील. पार्किंगची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या या स्थानकाच्या कामांनी वेग घेतला असून येत्या काही दिवसांत ही सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.