Darshana Pawar Murder Case : दर्शनाच्या हत्येमागचा एकमेव पुरावा, राजगडाजवळच्या सीसीटीव्हीत नेमकं काय?, पाहा फोटो...
MPSC टॉपर दर्शना पवार हिच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. त्यांनी मुंबईतील अंंधेरीतून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीचा आधार घेत या प्रकरणाचा पुढचा तपास करण्यात येणार आहे.
त्यातच सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे 8 च्या दरम्यान दोघे राजगडाच्या पायथ्याची ट्रेकला निघालेले दिसत आहे.
मात्र 10 वाजून 45 मिनिटांनी राहुल एकटाच परत येताना दिसत आहे.
राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत हे दोघे कैद झाले आहेत.
दर्शनाच्या हत्येचा राहुल हा एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे राहुल तपासादरम्यान पोलिसांना कोणती माहिती देतो. त्याने हत्या का केली आणि त्याचं दर्शनाबरोबर कोणतं नातं होतं किंवा किती वर्षांपासून त्या दोघांची मैत्री होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येणार आहे.
त्याला आमच्याकडे सोपवा नाही तर मारुन टाका, अशी मागणी दर्शनाच्या आई आणि भावाने केली आहे.