Dagadusheth Ganpati temple : उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त 'दगडूशेठ' गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य
गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त, पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम आणि सकाळी वाजता गणेश याग देखील पार पडला.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले. त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज.
नारळामुळे दगडूशेठ गणपतीला विहंगम रुप प्राप्त झालं आहे.
हे दगडूशेठ गणपतीची सजावट पाहण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे.
दरवर्षी उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त 'दगडूशेठ' गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवला जातो.