Rajgad fort | राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना ऐतिहासिक वस्तू हाती
राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही पुरातन नाणी, तोफेचे गोळे, तलवारीचे पाते, देवीच्या लहान मुर्ती आणि लोखंडी अडकित्ता सापडलाय.
या सर्व वस्तू अधिक अभ्यासासाठी पुरातत्व वाभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
राजगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गप्रेमी संस्थेच्या वतीने साफ सफाईचे काम सुरू असताना जमीनीखाली या वस्तू सापडल्या आहेत.
तलवारीच्या पात्याची रचना पाहता ते पोर्तुगीज पद्धतीच्या सरळ तलवारीचे असावे असा अंदाज आहे.
तर सापडलेल्या नाण्यांपैकी काही पेशवेकालीन आणि काही ब्रिटिशकालीन असावीत असा अंदाज आहे.
यामुळे इतिहास समजून घ्यायला मदत मिळणार आहे.
यातील अनेक वस्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत आहे.
धातुची मूर्ती
तोफगोळा
नाणी