Dumping Ground Fire : बारामतीमध्ये कचरा डेपोमध्ये आग, 80 लाख रुपयांचे नुकसान
बारामतीमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोला मध्यरात्री आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री दोनच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतं.
या आगीत जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीत कचरा वर्गीकरण करणारी यंत्रणा आणि कचरा जळून खाक झाली.
आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आग लागल्याचं समजताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा डेपोकडे धाव घेतली.
बारामती नगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय नगरपालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
कचरा डेपोमध्ये आग लागण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसताना अचानक मोठ्या प्रमाणात लागली ही बाब संशयास्पद असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.