Ajit Pawar: शरद पवारांसोबत बसणं टाळलं, पण जयंत पाटलांसोबत अजितदादांची हसत-खेळत चर्चा, दोघांमध्ये संवाद काय झाला?
आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची (Vasantdada Sugar Institute) 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या.
शरद पवार आणि अजित पवारांच्या यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं, अजित पवारांच्या शेजारी जयंत पाटील बसले होते, यावेळी अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी स्टेजवर हसत हसत चर्चा केल्याचं दिसून आलं.
पक्षफुटनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते आज एकाच व्यासपिठावर दिसले, त्यांनी एकदम हसून खेळून चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यात काय बोलणं झालं असावं याबाबत चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटलांमध्ये काय बोलणं झालं असावं याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे असतात त्यांची रक्कम वाढवली जावी अशी मागणी केली, ती मागणी शरद पवारांनी मान्य केली.
अजित पवारांच्या शेजारी जयंत पाटील बसले होते, यावेळी अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी स्टेजवर हसत हसत चर्चा केल्याचं दिसून आलं.