Pune Accident : भरधाव कंटेनरने 15 गाड्यांना दिली धडक! पोलिसांची गाडी सुटली नाही, पुण्यातील विचित्र अपघातात अनेक जखमी
चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरकडून दहा ते पंधरा गाड्यांना ठोकर दिल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी देखील पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत पुढे जात राहिला.
एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे.
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला असल्याची माहिती समोर आली आहे.
या कंटेनरने उडवलेल्या गाड्यामुळे आणि झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला आहे. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.