Pune By Election: उमेदवारी मिळताच अश्विनी जगताप मोरया गोसावी गणपतीच्या दर्शनाला; लवकरच प्रचाराला सुरुवात करणार
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Feb 2023 02:17 PM (IST)
1
चिंचवड विधानसभेसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नींना काल उमेदवारी जाहीर केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज अश्विनी जगतापांनी मोरया गोसावी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
3
पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या अश्विनी जगतापांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाने या नवीन वाटचालीची सुरुवात केली.
4
उद्या दुपारी एक वाजता अधिकृतरित्या त्या नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
5
लवकरच प्रचारालाही सुरुवात केली जाणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं.
6
अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
7
त्यासाठी कार्यकर्त्यांनीदेखील कंबर कसल्याचं दिसत आहे.
8
सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवातदेखील झाली आहे.