Mumbai-Pune Expressway Accident : पुणे एक्स्प्रेसवेवर आज पुन्हा अपघात, रॉड कारच्या आरपार घुसला, भीषण अपघाताचे फोटो
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमाटणे फाट्यावर डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला.
मात्र म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, अगदी त्याच्याच प्रत्यय या प्रसंगी ही आला.
अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतून प्रवास करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल असंच मनात येतं
पण सुदैवाने तिघांच्या मधून डिव्हायडरचा रॉड आरपार गेला.
या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे, त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान काल सुद्धा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कारने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला होता.
अर्धी कार ट्रक खाली अडकल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.
ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती.
उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ज्यात तिघांचा मृत्यू झाला होता.