Alandi News : आळंदी बंद: ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनात काही काळ गोंधळ
आळंदीकरांनी आज आळंदी बंदची हाक दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआळंदी बंदच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं.
यावेळी काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.
माजी नगराध्यक्षाचे पती अशोक उमरगेकर यांनी राजकीय वक्तव्य केलं आणि चुकीचा संदर्भ दिला. ( सर्व मंदिरं ही केंद्रांतर्गत येतात ) त्यामुळं उपस्थितांना त्यांना बोलण्यास विरोध केला. यानिमित्ताने काहीवेळ गोंधळ झाला.
त्यानंतर उपस्थितांच्या मध्यस्तीने त्यावर लगेचच पडदा पडला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचे सावट आहे.
यामुळं लाखो वारकऱ्यांची गैरसोय झालीये. विश्वस्त पदासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणं योग्य नाही, हे तर माऊलींना ही पटलं नसतं. असा सूर वारकऱ्यांमधून उमटत आहे.
आळंदी बंद दुपारनंतर स्थगित करण्यात येतोय. वारकऱ्यांना वेठीस धरायचं नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.