Pune news : धनगर समाजाकडून आरक्षणासाठी पुण्यात रास्तारोको आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2023 07:04 PM (IST)

1
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आज पुण्यात धनगर समाजाने शहरातील सारसबाग परिसरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या अर्धपुतळा याला अभिषेक करून रस्ता रोको आंदोलन केले.

3
आंदोलनकर्त्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशा गगनभेदी घोषणा देत सारसबाग चौकात ठिय्या मांडला.
4
महिलांचा लक्षणीय सहभाग बघायला मिळाला.
5
यावेळी अनेक धनगर समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
6
अनेकांनी एकत्र येत काही वेळ PMT बसेसदेखील रोखल्या.
7
यावेळी रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
8
आरक्षणासाठी सध्या मराठ्यासोबतच धनगर समाजही रस्त्यावर उतरताना दित आहे.