In Pics : पुण्याच्या तरुणाने टीपली बहुरुपी चंद्राची हजारो रुपं
चंद्राकडे पाहिल्यानंतर त्याबाबत कुतूहलपूर्ण प्रश्न निर्माण करणाऱ्यांपैकीच आपण सारेजण. वैज्ञानिकांपासून ते अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशाच या चंद्राची एकदोन नव्हे तर, तब्बल 55 हजार रुपं पुण्यातील एका युवकाने त्याच्या कमेऱ्यात कैद केली आहेत.
पुण्यातील प्रथमेश जाजू या ज्योर्तिर्विद्या परिसंस्था येथे काम करणाऱ्या तरुणाने ३ मेच्या रात्री एक ते पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या घराच्या टेरेसवरून चंद्राची जवळपास ५५ हजार छायाचित्र काढली आहेत.
यामध्ये चंद्राच्या छोट्या छोट्या भागांचाही समावेश आहे.
प्रथमेशने टेलिस्कोप आणि त्याच्याजवळ असणाऱ्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चंद्राची ही रुपं टीपली.
या कॅमेऱ्यामध्ये सर्वप्रथम व्हिडिओ टीपला जात आणि त्यातून मग २००० फोटो आपल्याला मिळतात.
काढण्यात आलेले २५ व्हिडिओ हे २००० फोटोंचे होते तर, उर्वरित काही ५०० ते ७०० फोटोचे होते. फोटो आणि व्हिडीओ असे हे सर्व घटक जवळपास १०० जीबीचे होते असंही कळत आहे. व्हिडिओतुन आलेल्या सगळ्या फोटोंचा एक फोटो मर्ज करत करण्यात आला. बाकीचे सगळे फोटो मर्च केल्यानंतर त्यांना फोटोशॉप स्पीच करण्यात आले. यानंतर चंद्राचा एक सुरेख असा अदभूत फोटो हाती आला. हा फोटो कितीही प्रमाणात झूम केला तरीही तो पिक्सलेट होणार नाही अशाच प्रतीचा होता.(सर्व छायाचित्रं- prathameshjaju/ इन्स्टाग्राम)