In Pics : नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांची अनोखी रांगोळी साकारली; भारतकन्यांना अनोखा सलाम
पुण्यात नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या रांगोळींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखं काम करत असलेल्या महिलांच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यशस्वी महिला सुधा मूर्ती, सरस्वतीकन्या आशा भोसले यांच्यापासून ते फ्लाईंग वुमन गुंजन सक्सेना, गोल्डन गर्ल हिमा दास, अभिनेत्री विद्या बालन, मिसाईल वुमन टेसी थॉमस, पत्रकार ज्ञानदा कदम आणि पुण्यातील ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनिषा साठे या सगळ्या महिलांच्या रांगोळ्यांचा समावेश आहे.
पोर्टेट रांगोळी प्रदर्शनातून या भारतकन्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला आहे.
श्रीरंग कलादर्पणच्या विद्यार्थिनींनी एरंडवण्यातील सहकार उद्यान येथे नवदुर्गा : नवरात्री विशेष पोर्टेट रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या हिमा दासची देखील रांगोळी साकारण्यात आली आहे,
या सगळ्या महिलांना नवरात्रीनिमित्त अनोखा सलाम करण्यात आला आहे.
आशा भोसलेंचाही यात समावेश आहे.
त्या महिलांच्या क्षेत्रानुसार घोषवाक्य किंवा कॅप्शन या रांगोळ्यांना देण्यात आलं आहे.