Pune News : रेड कार्पेट, ढोल ताशा अन् शेकडो कार्यकर्ते; जेपी नड्डांच्या स्वागतासाठी बालगंधर्व रंगमंदिर सज्ज
पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.
त्यांच्यास्वागतासाठी भाजपकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
ढोल-ताशा आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले आहेत.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी असे मिळून 1200 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बालगंधर्व येथील बैठक झाल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरु आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
येत्या काही महिन्यात निवडणुका आहेत. त्याचीच रणनिती आखण्याची तयारी सुरु आहे.
भाजप 200 च्यावर जागांवर विजय मिळवेन, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.