Vijay Shivtare On Ajit Pawar : जेजुरीवर जाऊन भंडारा उचलला, विजय शिवतारे म्हणाले, राक्षसी प्रवृत्तीचा वध करणार!
विजय शिवतारे म्हणाले, राक्षसाचा वध मार्तंडने केला त्याच राक्षसी प्रवृत्ती विरोधात मी लढतो आहे. 41 वर्ष पवारांनी सत्ता राबवली त्यांच्या विरोधात मी लढतो आहे. माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी सांगू सांगू इच्छितो की इथली स्थानिक समीकरणं वेगळी आहेत (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीमध्ये अजित पवारांच्याबाबत नाराजी आहे. आता इथला सर्व्हे करावा, सुनेत्रा पवारांना मतदान होणार नाही, त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला असता, असा दावा विजय शिवतारे यांनी केला. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
माझी भूमिका मी एकनाथ भाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगेन, त्यांना भूमिका सांगितल्यावर ते मला काहीही म्हणणार नाहीत. मी सर्वसामान्य जनतेची भूमिका घेऊन निघालो आहे, असं विजय शिवतारे म्हणाले. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
आता सर्व्हे करा आणि मग ठरवा असे सांगेल. पण मी आता माघार घेणार नाही मी आता फार पुढे गेलो आहे, अशी गर्जना विजय शिवतारे यांनी केली. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
अजित पवार आणि शरद पवारांनी माझ्यावर टीका केली तर मी त्यांना उत्तर देईल मी भाट लोकांना उत्तर देणार नाही, असं म्हणत विजय शिवतारे यांनी अमोल मिटकरी आणि आनंद परांजपे यांच्यावर निशाणा साधला.(छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटातही ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत. त्यामुळे शप्पत घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाही, असा दावा विजय शिवतारेंनी केला आहे. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)