अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकारणातील मोठी भेट, विधानभवनाच्या लिफ्टमधून ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास
राज्याच्या पावसाळी अधिवेशानाची सुरुवात राजकारणातल्या एका मोठ्या भेटीने झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधीमंडळच्या लिफ्टजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना बरंच उधाण आलं आहे.
विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले.
यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुजबी संवाद देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्यातच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्यावेळी देखील महाराष्ट्रात राजकारणात अनेक वार प्रतिवार होणार असल्याचं पाहायला मिळेल.
या लिफ्टमध्ये ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत भाजपने नेते प्रवीण दरेकर देखील होते. तसेच यावेळी प्रतिक्रिया देताना दरेकरांनी म्हटलं की, ठाकरेंनी मला पाहून म्हटलं की, याला आधी बाहेर काढा. त्यावर दरेकरांनी उत्तर देताना म्हटलं की, तुम्ही दोघं एकत्र येणार असाल तर मी आधी बाहेर पडायला तयार आहे.
लिफ्टमधील या प्रवासाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.